शेतीत प्रयोगासाठी धडपडणा-या तरूणांचा अभिमान वाटतो : सरपंच समित घाणेकर

गुहागर (प्रतिनिधी) मुंबईची वाट न धरता ही गावाकडे असलेली काही तरूण मुलं वन्य प्राण्यांकडून अनेकदा नुकसान होऊनही शेतीत प्रयोग करण्यासाठी धडपडताहेत, हे अभिमानास्पद असल्याचे मत सरपंच समित घाणेकर यांनी व्यक्त केले. पं.स.गुहागर व कृषी विभाग जि.प.रत्नागिरी च्या संयुक्त विद्यमाने हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत आरे-पिंपळवट येथील तरूण शेतकरी सतीश धावडे यांच्या शेतावर SK-4 हळद रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच समित घाणेकर यांनी आपले मत व्यक्त केले. या तरूणांना पंचायत समितीचा कृषी विभाग सतत योग्य मार्गदर्शन करत असल्याने त्यांनी समाधानही व्यक्त केले. या उपक्रमांतर्गत सतीश धावडे यांच्या शेतावर 10 गुंठे क्षेत्रावर हळद लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. यावेळी पिंपळवट गावचे अध्यक्ष व माजी सरपंच प्रभाकर धावडे, नरेश धावडे,कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर,जयेश पागडे,कुणाल गावडे, श्वेता पागडे,रोहिणी गावडे
काजल धावडे,शेतकरी सतीश धावडे ,शिक्षक श्री.बोले,हिरा गोताड,प्रतिशा पवार इ.शेतकरी उपस्थित होते.