दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मा.श्री. तुकाराम मुंढे यांच्या सुचनेनुसार दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांची पाहणी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वैदेही रानडे (भा.प्र.से.)यांच्या मार्फत करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने शुक्रवार दि. 28/11/2025 रोजी रत्नागिरी जिल्हात दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेच्या कामाची पाहणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समितीने केली. आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी च्या दिव्यांग हेल्पलाईन, आस्था थेरपी सेंटर व फिरते श्रवण चाचणी कक्ष या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाची माहिती घेतली व कामाबद्दल समितीने समाधान व्यक्त केले.
या समितीत मा. वैदेही रानडे यांच्या सह जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा. सुनीता शिरभाते,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री.संजय बलाढये यांचा समावेश होता. संस्थेच्या सचिव श्रीम.सुरेखा पाथरे, श्री.संकेत चाळके, व श्रीम. संपदा कांबळे यांनी संस्थेची माहिती समितीला दिली.












