शिकारीवेळी युवकाचा मृत्यू प्रकरणातील दुचाकी ताब्यात

कोल्हापूर येथे शवाविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार

सावंतवाडी : ओवळीये येथे सहकाऱ्यासमवेत शिकारीसाठी गेलेला असताना श्वापद समजून झाडलेली गोळी लागून वेर्ले येथील सचिन सुभाष मर्गज या २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. या शिकारप्रकरणी वापरलेली संशयताची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याआधी पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली बंदूक व छर्रे ताब्यात घेतले होते. दरम्यान, मृत सचिन मर्गज याचा मृतदेह सुरुवातीला ओरोस सिंधुदुर्ग व तिथून कोल्हापूर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर वेर्ले येथे शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी सिप्रियान ॲन्थोनी डान्टस ( वय ३५, रा. कोलगांव ) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला ९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.