कुणबी संघ शाखा चिपळूण मुंबईच्या वतीने १० रोजी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

चिपळूण  : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा चिपळूणच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक विकास निधी संकलन करण्यासाठी शाखेच्या वतीने दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळा दिनांक बुधवार १० रोजी दादर येथील शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून कोकणची लोककला “नमन” कलेचे सादरीकरण होणार आहे.

चिपळूण संघ शाखेच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी शाखा असे विविध उपक्रम राबवते. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून उद्योजक वसंत उदेग, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई अध्यक्ष अनिल नवगणे, माजी सरचिटणीस, जेष्ठ समाज राजाभाऊ कातकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला चिपळूण शाखा आणि समाज बांधव यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा चिपळूणचे
अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर, सरचिटणीस रणजित वरवटकर, खजिनदार अमेय खापरे यांनी केले आहे.