गुहागर | प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली अंतर्गत आरोग्य पथकामार्फत पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील श्रृंगारतळी बाजारपेठ येथे ‘हिवताप प्रतिरोध मोहीम’ आणि कंटेनर सर्वेक्षण यशस्वीरीत्या राबवण्यात आले. ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यादव यांच्या आदेशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जांगीड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान आरोग्य पथकाने श्रृंगारतळी बाजारपेठेतील सर्व भंगार व टायर व्यावसायिकांना प्रत्यक्ष भेट दिली. तेथे कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. ज्या
ठिकाणी डासअळी आढळून आली, त्या ठिकाणी तात्काळ टेमिफॉस जंतूनाशक टाकून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. तसेच संबंधितांना डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. या मोहिमेमध्ये तालुका पर्यवेक्षक एन. बी. जानवळकर, किटकशास्त्रज्ञ पी. आर. वाडकर, आरोग्य निरीक्षक एस. के. भालेराव, आरोग्यसेवक पी. एस पुप्पुलवार, आरोग्यसेवक व्ही. वाय. विलणकर, आरोग्यसेवक अंगद लांडे आदी आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












