प्राथमिक गटात चुनाकोळवण शाळा तर माध्यमिक गटात शिवणेखुर्द हायस्कुल विद्यार्थी प्रतिकृती प्रथम

५३ वे राजापूर तालुका विज्ञान प्रदर्शन साखरीनाटेत संपन्न
राजापूर : ५३ वे राजापूर तालुका विज्ञान प्रदर्शन शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा, साखरीनाटे येथे विज्ञान दिंडी, विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान प्रतिकृती स्पर्धा आणि मान्यवरांचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडले.
जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती राजापूर, विज्ञान व गणित मंडळ राजापूर, नाटे-आंबोळगड केंद्र, साखरीनाटे एज्युकेशन बोर्ड संचलित, मॉडर्न हायस्कूल साखरीनाटे, आयडीएल इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यामाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ या वियावरील आयोजित या विज्ञान प्रदर्शनात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत विकास कसा साधता येईल यावर या शिबिरात मंथन करण्यात आले. या शिबीराचे अध्यक्षस्थान साखरीनाटे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमजद बोरकर यांनी भुषविले.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन तहसिलदार विकास गंबरे यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, साखरीनाटे सरपंच सौ. गुलजार ठाकूर, विज्ञान मंडळ जिल्हा कार्यवाह सुभाष सोकासने, विस्तार अधिकारी सुनिल पाटील, फकीर महंमद पावसकर, मलिक गडकरी, दिवाकर आडविरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील ९० प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांनी आपल्या विज्ञान प्रतिकृती मांडल्या होत्या. त्यामधून प्राथमिक विद्यार्थी गट प्रतिकृती स्पर्धेत जि. प. चुनाकोळवण शाळेच्या पायल राजेंद्र भेरे हीने प्रथम, कोंडये हायस्कुलच्या स्वरा गुरव व तैसिम सिरवणकर हिने द्वितीय तर जि. प. गोखले कन्याशाळेच्या शर्विल उत्तम भोसले व वेदांत पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
माध्यमिक गट विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेत शिवणेखुर्द हायस्कुलच्या नंदन नितीन बापट याने प्रथम, कोंडये हायस्कुलच्या सृष्टी संदीप कांबळे व श्र्रावणी प्र. सावंत यांनी द्वितीय तर पाचल हायस्कुलच्या प्राची प्र. सुतार व निल मं. जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
प्राथमिक स्तर इयत्ता ६ वी ८ वी शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात जि. प. चुनाकोळवण  नं. १ च्या सहदेव पालव यांनी प्रथम तर सरस्वती विद्यामंदिर पाचलच्या सुनिल मदने यांनी द्वितीय तर जि. प. शाळा ताम्हाणे नं. २ च्या विनायक साळुंखे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती  गटात पाचल हायस्कुलच्या सत्यनारायण देसाई  यांनी प्रथम, शिवणेखुर्द हायस्कुलच्या  आर. व्ही. जानकर यांनी द्वितीय तर केळवली हायस्कुलच्या  संतोष कदम यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
प्रयोगशाळा परिचर साहित्यनिर्मिती गटात सरस्वती विद्यामंदिर पाचलच्या मंगेश पांचाळ यानी प्रथम तर नूतन विद्यामंदिर ओणीच्या प्रमोद यादव  यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
दिव्यांग प्राथमिक गट प्रतिकृती स्पर्धेत जि. प. शाळा चुनाकोळवण नं. १ च्या राज जगन्नाथ बाईत याने प्रथम तर राजापूर हायस्कुलच्या यशोदीप र. घोसाळे याने द्वितीय क्रमांक पटकावला.
दिव्यांग माध्य. गट प्रतिकृती स्पर्धेत मॉडर्न हायस्कुल साखरीनाटे च्या  उमेर अश्फाक सोलकर याने प्रथम क्रमांक पटकावला.
अमजद बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी लियाकत शानदार, मलिक गडकरी, श्री.सोकाने, सरपंच सौ. ठाकूर आदी आदी मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रासंचालन राजापूर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांनी केले. तर आभार सुनिल मदने यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साखरीनाटे हायस्कुलचे मुख्याध्यापक परवेझ अस्सी, अकबर कादरभाई, किरण टिळेकर, फरहाना फणसोपकर, शबनम पावसकर, सादिका भाटकर, आशिष राणे, परवेझ म्हसकर, साक्षी टिळेकर  राजाभाऊ मुंडे, केंद्र मुख्याध्यापक विनायक शिरसेकर, केंद्रप्रमुख सुनिल जाधव, गणित मंडळ अध्यक्ष अरुण कुऱ्हाडे तसेच साखरीनाटे एज्युकेशन सोसायटी पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदातर्फे करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी नियोजनाबद्दल सर्वच मान्यवरांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.