महामार्गावर ओणी येथे टेम्पोची दुचाकीला धडक

दुचाकीस्वार गंभीर जखमी
टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल

राजापूर प्रतिनिधी: मुंबई-गोवा महामार्गावर ओणी पेट्रोलपंपासमोर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार हरेश भितळे (36, मंदरूळ, गणेशवाडी) हा गंभीर जखमी झाला आहोमंगळवारी सायंकाळी 6 वाजता हा अपघात घडला. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातातील गंभीर जखमी दुचाकीस्वाराला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी वैभव शांताराम मासये यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. हरेश भितळे हे ओणी येथून मुंबई-गोवा महामार्गाने तिवंदामाळ येथे त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक (एम.एच.08 बी.जे. 1775) ही घेवून जात असताना समोरून विरूध्द दिशेने येणाऱ्या टेम्पो क्रमांक (एम.एच 04 बी.यु 3242) टेम्पोवरील चालकाने ओणी पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्याच्या विशिष्ट परस्थितीकडे लक्ष न देता बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून हरेश भितळे यांच्या ताब्यातील दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भितळे हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला होता.
या अपघातामध्ये हरेश भितळे यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पकरणी राजापूर पोलीसांनी टेम्पो चालक हुसेन अब्दुल पाटणकर (वाकेड, खालीवाडी, लांजा) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 अ. ब. व मोटर वाहन कायदा कलम 184, 134/177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक मोमीन शेख व सहकाऱ्यांनी तात्काळ अपघात स्थळी भेट दिली. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक मोमीन शेख करत आहेत.