ओटवणे चव्हाटा महोत्सव 19 ते 21 डिसेंबर रोजी

ओटवणे (प्रतिनिधी)        ओटवणे येथील गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळ,ओटवणे यांच्या वतीने आयोजित गांव चव्हाटा महोत्सव 2025 या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन येत्या शुक्रवार 19डिसेंबर २०२५ ते रविवार 21 पर्यंत करण्यात आले आहे या महोत्सवाची सुरुवात उदघाटन शुक्रवारी सायं ७ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार आह,रात्रौ ८ वा. दशावतारी कलाकृती व कलाकारांचा इतिहास सांगणारी ‘मयुर स्वरांचा दशावतार’ ही संगीत मैफिल रंगणार आहे यात गायक- बुवा. मयुर ग वळी,पखवाज- कौशल मेस्त्री,तालरक्षक- बाबाजी गावकर आणि निवेदनाची जबाबदारी दशावतार चे अभ्यासक विश्लेषक राजा सामंत यांच्यावर असणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५,रात्रौ ८ वा. स्थानिक मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.तर अंतिम दिनी रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सायं ५ वा. फनी गेम्स,रात्रौ ८ वा. श्री दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

कै. गोविंद भोरू गावकर स्मृती रंगमंच गावठणवाडी येथे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळ,ओटवणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.