आई जीवदानी कला फाउंडेशनच्या वतीने २१ रोजी विविध नमन कला पुरस्कारांचे वितरण

चिपळूण (वार्ताहर) : सांस्कृतिक कलेतील एक उत्तुंग संस्था आई जीवदानी कला फाउंडेशन यांच्या वतीने रविवार २१ रोजी रात्री ७ वाजता सोळंकी हायस्कूल विरार येथे नमन कलेतील कर्तृत्वान व्यक्ती यांना कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

आई जीवदानी कला फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष भिकाजी भुवड यांच्या संकल्पनेतून साकारलेला नमन कला गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. नमन कलेतील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव नमनकला पुरस्काराने करण्यात येणार आहे. यावेळी नमन कला उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट लोकशाहीर, उत्कृष्ट संस्थापक, नमन कला उत्कृष्ट संगीतकार, नमन कला हरहुन्नरी कलाकार, आणि नमन कला कलावंत पालक असे विविध पुरस्कार यावेळी निवड झालेल्या व्यक्तींना देण्यात येणार आहेत. रविवार दिनांक २१ रोजी आई जीवदानी कला फाउंडेशनच्या कार्यक्रमांमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष भिकाजी भुवड आणि सहकारी यांनी केले आहे.