अवघ्या दोन तासात स्पष्ट होणार राजापुर नगर परिषदेच्या निवडणूक निकालाचे चित्र

पाच टेबलांवर दोन टप्प्यात होणार मतमोजणी
पहिल्या टप्प्यात एक ते पाच तर दुसऱ्ऱ्या टप्प्यात सहा ते दहा प्रभागाती मतमोजणी होणार
मतमोजणीसाठी प्रशाकिय यंत्रणा सज्ज

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात रविवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. राजापूरातील दहा प्रभागांतील मतमोजणी दोन टप्प्यात होणार असून यासाठी पाच टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील नगराध्यक्षपदासह नगसेवक पदासाठीची मतमोजणी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पुढील सहा ते दहा प्रभागातील नगराध्यक्षपदासह नगसेवक पदासाठीची मतमोजणी होणार आहे. तशी माहिती राजापूर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी पत्रकारांना दिली.
दोन टप्प्यात मतमोजणी होणार असल्याने अवघ्या दोन ते अडीज तासात राजापूरातील निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तीन तर दहा प्रभागांतील २० नगरसेवकपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे गेली होती, ती रविवारी २१ डिसेंबर रोजी होणार असे निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आले होते. त्यामुळे आता साऱ्यानाच निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. गुरूवारी पत्रकार परिषदेत गंबरे यांनी कशा प्रकारे मतमोजणी होणार आहे त्याची माहिती दिली.
राजापूरातील दहा प्रभागांतील मतमोजणी दोन टप्प्यात होणार असून यासाठी पाच टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील नगराध्यक्षपदासह नगसेवक पदासाठीची मतमोजणी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पुढील सहा ते दहा प्रभागातील नगराध्यक्षपदासह नगसेवक पदासाठीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे अवघ्या दोन ते अडीज तासात राजापूरातील निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
यासाठी मतमोजणी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर आवश्यक तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनाच नगर परिषद इमारत व मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार असून मोबाईल आणण्यास पुर्णपणे प्रतिबंध रहाणार असल्याचे गंबरे यांनी सांगितले।
या पत्रकार परिषदेला मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयंत जावडेकर, कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक मोमीन शेख उपस्थित होते.
मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर कडक पोलीस बंदोबस्त
रविवारी २१ डसेंबर रोजी होणाऱ्या या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडूनही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उपविभागिय अधिकारी सुरेश कदम यांसह राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव व अन्य आठ अधिकारी, ११० पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या १०० मिटर परिक्षेत्रात वाहतुक पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
सकाळी ९ ते दुपारी १ जवाहर चौकातील एसटी वाहतुक बंद रहाणार
रविवारी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राजापुरात जवाहर चौकात येणारी एसटी वाहतुक सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुक व सुरक्षिततेच्या कारणास्तव ही वाहतुक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
फोटो नगर परिषद इमारत