कोलगाव श्री देवी सातेरी कलेश्वर मंदिरामुळे गावाचा पर्यटनात्मक विकास होईल 

 

भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा विश्वास 

श्री सातेरी व कलेश्वर मंदिर सुशोभीकरण व कोलगाव ग्रामसचिवालय कामाचा शुभारंभ 

सावंतवाडी l प्रतिनिधी :कोलगाव येथील श्री देवी सातेरी व श्री देव कलेश्वर मंदिराचा पर्यटनात्मक दृष्ट्या विकास होणार आहे. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ग्रामसचिवालयात सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असणार आहे. भविष्यात कोलगाव जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीवर भाजपच्या विचाराचेच प्रतिनिधी निवडून येतील, असा विश्वास भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी व्यक्त केला.

 

प्रादेशिक पर्यटन व क वर्ग यात्रा स्थळ योजनेअंतर्गत कोलगाव येथील श्रीदेवी सातेरी व श्री देव कलेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच ग्रामसचिवालय बांधणे साठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामपंचायत सदस्य संदिप हळदणकर, राजा चव्हाण, रेश्मा मेस्त्री, करमळकर, कोलगाव सोसायटीचे चेअरमन विरेंद्र धुरी, माजी सरपंच बळवंत कुडतरकर, कोलगाव सातेरी देवस्थानचे अध्यक्ष चंदन धुरी, कलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष राजन राऊळ, भाई राऊळ, पुंडलिक राऊळ, रामनाथ बावकर, अनिल धुरी, विजय धुरी, प्रकाश धुरी, अशोक धुरी, श्रीहरी धुरी, बड्या केरकर, भाजपा बूथ अध्यक्ष सुरेश दळवी, दिपक डाबरेकर, रुपेश कुडतरकर, सोसायटीचे संचालक रामा पालव, जयानंद म्हापसेकर, बाबुराव चव्हाण, माजी सरपंच पप्पु ठिकार, राजन चेंदवणकर, विशाल पालव, रमेश नाईक, बाबु करमळकर, बाळा राऊळ उपस्थित होते.

 

महेश सारंग म्हणाले, भाजपच्या तीन मोठ्या नेत्यांची मला भक्कम साथ आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचेही सातत्याने सहकार्य मिळते. भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले.