पुनस ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

शिबिरात २४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

लांजा (प्रतिनिधी) :तालुक्यातील पुनस ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर आज शुक्रवारी उत्साहात पार पडले. या शिबिरात २४ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत निर्मल ग्रुप ग्रामपंचायत पुनस यांच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून या रक्तदान शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे ही बाब लक्षात घेऊन पुनस सरपंच संतोष लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.‌
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरी यांच्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाने यासाठी सहकार्य केले .तर संपूर्ण शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुनस ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष लिंगायत यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व सर्व कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली .
अशा प्रकारचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी दाखवून देणाऱ्या पुनस ग्रामपंचायतीच्या या कार्याचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.