निबंध स्पर्धेत आर्या राणे प्रथम तर शमिका भाबल दुसरी

सावंतवाडी : प्रतिनिधी
मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित, श्रीराम वान मंदिर, सावंतवाडी आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनांतर्गत विद्यार्थ्यांसाठी खुली निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील पहिले पाच उत्कृष्ट निबंध जाहीर करण्यात आले.

बांदा-सावंतवाडी येथील खेमराज मेमोरियल इं. स्कूल व डॉ. व्ही.के.तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातील आर्या अनिल राणे (इ.11 वी) हिच्या निबंधास प्रथम, द्वितीय शमिका संतोष भाबल (श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्य. विद्यामंदिर, जामसंडे-देवगड), तृतीय मैथली मनोहर सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली), उत्तेजनार्थ 1-सानिका सत्यवान राऊळ (नेमळे कॉलेज, नेमळे), उत्तेजनार्थ 2 क्रमांक सानवी निळकंठ गुरव (कलंबिस्त इंग्लिश स्कूल) यांना मिळाला.

प्रा. सुषमा मांजरेकर, भरत गावडे, डॉ. दीपक तुपकर यांनी या स्पर्धो परीक्षण केले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण २८ डिसेंबरला सावंतवाडी येथे साहित्य संमेलनाच्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.