ना उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने युवा सेनेच्या वतीने 25 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी
राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने युवा सेना रत्नागिरी च्या वतीने 25 डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा सेनेच्या वतीने दरवर्षी ना सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व अन्य सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. रक्तदान हे जीवनदान याच भावनेतून या शिबिराचे आयोजन 25 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जाणवणारा रक्ताचा तुटवडा पाहता. ना सामंत यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक आदर्श घडवावा. तालुक्यातील सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन युवा सेना तालुकाप्रमुख तुषार साळवी यांनी केले आहे.