राजापुरातील प्रतिष्ठीत व्यापारी अलिमियाँ काझी यांचे निधन

राजापूर | प्रतिनिधी : शहरातील मधीलवाडा येथील रहिवाशी व शहर बाजारपेठेतील ए. वाय. काझी आणि कंपनीचे मालक प्रतिष्ठीत व्यापारी अलिमियाँ युसूफ काझी (८९) यांचे मंगळवारी दुपारी वृध्दापकालाने रहाते घरी निधन झाले.
राजापूर शहर बाजारपेठेतील ए. वाय. काझी आणि कंपनीच्या स्टेशनरी व कटलरी दुकानाचे मालक असलेले अलिमियाँ काझी यांची वृध्दापकालामुळे गेले काही दिवस प्रकृती बरी नव्हती, त्यातच मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालावली.
एक शांत, संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. सामाजिक कामातही त्यांचा कायमच सक्रिय सहभाग असे. आपल्या व्यवसायात त्यांनी मुलांनाही भक्कम पाठबळ देत व्यवसायाला गती दिली.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या मधीलवाडा येथील निवासस्थानी धाव घेत काझी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.