इर्शाळवाडी येथे मदत व बचाव कार्यासाठी पोहचला मालवणचा आपत्कालीन ग्रुप 

मालवण | प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. एका वसाहतीवर दरड कोसळून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले. मोठे मदतकार्य सुरू आहे. सुमारे १०० जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आले तर दुर्दैवाने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू आहे. मालवण येथील आपत्कालीन ग्रुप मदत व बचाव कार्यासाठी गुरुवारी दुपारी इर्शाळवाडीला रवाना झाला.

 

मोठया प्रमाणात पाऊस असल्याने सायंकाळी उशिरा ही टीम घटनास्थळी पोहचली. प्रशासनाकडून तसेच स्थानिकांकडून माहिती घेण्यात आली. शुक्रवारी सकाळी सर्वजण बचाव व मदत कार्यात साहभागी झाले आहेत.

 

आपत्कालीन ग्रुपमध्ये दामोदर तोडणकर, सचिन गोवेकर, वैभव खोबरेकर, सुजित मोंडकर, प्रथमेश आढाव, नितेश पराडकर, रसिक सारंग, लारा मयेकर, चेतन लुडबे यांचा सहभाग आहे. यापूर्वीही अनेक ठिकाणी मदत व बचाव कार्यात आपत्कालीन ग्रुप मालवण सहभागी झाला आहे.

 

फोटो : इर्शाळवाडी येथे मदत व बचाव कार्यासाठी पोहचलेला आपत्कालीन ग्रुप मालवण. (अमित खोत, मालवण)