चिपळूण Updates : चिपळूण मधील जनजीवन आले पूर्वपदावर

 

 

 

१. सध्या वशिष्ठी नदीची पातळी २.६० मी म्हणजेच इशारा पातळीच्या खाली आहे. शहरात सध्या कोणत्याही ठिकाणी पाणी नाही. सध्या चिपळूण परिसरात पाऊस नाही क्वचित पावसाच्या सरी येतात.

 

२. कुंभार्ली घाटात वाहतूक सुरळीत सुरू आहे.

 

३. कोकण रेल्वे- कोणतीही समस्या नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.

 

४. परशुराम घाटात दुहेरी वाहतूक सुरळीत सुरू आहे. परशुराम घाटात लाईटची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.

 

५. मौजे धनगरवाडी ( पोफळी ) ता. चिपळूण येथील प्रकाश सोन्याबुवा झोरे यांच्या काल रात्री ४ म्हशी व १ रेडा पुराच्या पाण्यात वाहून गेलेला होता. सदर ५ ही जनावरे आज सकाळी जिवंत मिळालेली आहेत. पोफळीमधील पवारवाडीतील श्री. दत्ताराम विठ्ठल ढेबे यांचे म्हशीचे २ रेडकू काल रात्री वाहून गेले होते. त्यापैकी १ मृत अवस्थेत सापडले आहे तर एकाचा अद्याप शोध लागलेला नाही.

 

६. चिपळूण शहरातील मुरादपूर वरची भोईवाडी येथील शैलेश रामचंद्र शिंदे यांच्या गोठ्याला रात्री 2.30 am ला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती. त्यामुळे लाकडे व शेणी यांनी पेट घेतला होता. चिपळूण नगर परिषद अग्निशामक दलास 3.35 am वाजता आग विजवण्यात यश आले. कोणतीही जीवितहानी नाही.

 

७. चिपळूणमधून रायगडला पाठविलेले ३ कंटेनर सध्या माणगावच्या पुढे १५ किमीवर आहेत. ९ वाजेपर्यंत ते तात्पुरत्या पुर्नवसन करण्याच्या ठिकाणी पोहचतील.