सरपंच आशु मयेकर यांनी स्वखर्चाने रस्ता केला वाहतूक योग्य!

मसुरे | झुंजार पेडणेकर : बांदिवडे आडवली मुख्य रस्ता ते पावणाई मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी सरपंच आशु मयेकर यांनी स्वखर्चाने नुकतीच केली. सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडीझुडपे वाढली होती. वार्षिक महागोंधळ कार्यक्रमास येणारे भक्त तसेच इतर वाहतुकीमुळे धोका पोहोचू नये यासाठी सरपंच आशु मयेकर यांनी स्वखर्चाने ही झाडे झुडपे तोडली आहेत. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती सरपंच आशु मयेकर यांनी दिली आहे.