छंदोत्सवाची सांगता पारितोषिक वितरणाने’

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात यावर्षीही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘छंदोत्सव’ दिमाखात संपन्न झाला. अनेक विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले. यावर्षीच्याही छंदोत्सवामध्ये गीत गायन स्पर्धा , एकलनृत्य , युगुल नृत्य आणि समूहनृत्य स्पर्धा ,फूड फेस्ट स्पर्धा घेण्यात आल्या. विविध कलाप्रदर्शने आयोजित करण्यात आली होती.
नव्या पिढीसाठी रिल्स मेकिंग स्पर्धा ही घेण्यात आली.
विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे मान्यवर, महाविद्यालयाचे प्राचार्य , उपप्राचार्य व पर्यवेक्षक उपस्थित होते.
विविध स्पर्धांचे निकाल खालील प्रमाणे,
*गीत गायन स्पर्धा -प्रथम क्रमांक -* कुमारी ऊर्जा हर्षद आपटे(११वी शास्त्रअ) ,द्वितीय क्रमांक -श्रिया अभिजीत केळकर(१२वी कला अ) ,तृतीय क्रमांक -गिरीराज दिगंबर लिंगायत(१२वी वाणिज्य क).
*एकलनृत्य स्पर्धा -प्रथम क्रमांक* जानवी अजित कळंबटे, द्वितीय क्रमांक- यामिनी किशोर कुमार पोयरेकर ,तृतीय क्रमांक -ऋत्वी जयेंद्र केदार,
*युगल नृत्य स्पर्धा* -लक्षवेधी सादरीकरण -आयुषी संदीप नाईक आणि लावण्या दीपक नार्वेकर‌,
*समूह नृत्य स्पर्धा* -प्रथम क्रमांक – आई एकविरा ग्रुप, द्वितीय क्रमांक -कला सार्थ ग्रुप ,तृतीय क्रमांक -जोगवा.
*रांगोळी स्पर्धा -(विषय -माझा भारत माझा अभिमान) प्रथम क्रमांक* -श्रावणी बाहुबली नाईक (११वी वाणिज्य अ)व गार्गी विवेक केळकर(११वी वाणिज्य अ) द्वितीय क्रमांक – तन्वी श्रीपाद पालकर(११वी शास्त्र अ) तृतीय क्रमांक -पूर्वा श्रीनिवास बिज्जरगी (१२वी शास्त्र अ) प्रांजल यजमान यशवंत कुडचिकर (१२वी शास्त्र अ)
*शैक्षणिक रांगोळी स्पर्धा-(अभ्यासाशी निगडित) प्रथम क्रमांक-* क्षितिज रुपेश नांदिवडेकर(१२वी शास्त्र अ) , द्वितीय क्रमांक- आर्यन संदीप सालम (१२वी शास्त्र ड),तृतीय क्रमांक- वीणा योगेश काळे व हर्षाली सुदय चाळके (१२वी शास्त्र अ)
*छायाचित्र स्पर्धा(निसर्गातील आकृतीबंध)- प्रथम क्रमांक* – वरद उदय आरेकर (१२वी शास्त्र अ) द्वितीय क्रमांक- निधी प्रदीप सुर्वे (११वी शास्त्र अ)तृतीय क्रमांक -अमन अमित कुरूप.(११वी शास्त्र अ)
*छायाचित्र स्पर्धा (रंग कोकणचे )-* प्रथम क्रमांक -रिद्धी प्रदीप ब्रीद(११वी वाणिज्य क) द्वितीय क्रमांक -ज्ञानदा उत्तम कातकर (११वी शास्त्र क),तृतीय क्रमांक -अनुष्का दिलीप शिंदे(१२वी कला ब)
*चित्रकला स्पर्धा (माझे आवडते व्यक्तिमत्व)-* प्रथम क्रमांक -ऋषभ हर्षद कोतवडेकर(११वी वाणिज्य क) द्वितीय क्रमांक – पार्थ समीर शिरवडकर (१२वी शास्त्र क)तृतीय क्रमांक -क्षितिज रुपेश नांदीवडेकर.(१२वी शास्त्र अ)
*फूड फेस्ट स्पर्धा -प्रथम क्रमांक* -व्हेज क्लायमेट ग्रुप, द्वितीय क्रमांक- क्विक बाईट्स ग्रुप ,तृतीय क्रमांक – सेव्हन स्टार्स ग्रुप ,
*रिल्स मेकिंगस्पर्धा -प्रथम क्रमांक* – रुद्र आशिष शिवलकर (१२वी शास्त्र अ)द्वितीय क्रमांक- कल्पेश किरण पालकर ,(१२वी शास्त्र ई) तृतीय क्रमांक- ज्ञानदा उत्तम कातकर(११वी शास्त्र क).

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील आदर्श विद्यार्थिनी, विद्यार्थी व अष्टपैलू विद्यार्थी यांच्या नावांची घोषणाही या समारंभात करण्यात आली. आदर्श विद्यार्थी- ऋषिकेश शशिकांत कोतवडेकर (१२वी शास्त्र अ), *आदर्श विद्यार्थिनी -जान्हवी मनोज सावंत (१२वी वाणिज्य अ),*
*अष्टपैलू विद्यार्थिनी वीणा योगेश काळे (१२वी शास्त्र अ)* यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यश प्राप्त व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी स्कूल कमिटी अध्यक्ष श्री आनंद देसाई , सहकार्यवाह श्री .श्रीकांत दुदगीकर , लाईफ मेंबर बोर्ड अध्यक्ष श्री महेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शामराव करंडक स्पर्धा प्रायोजक रत्नागिरीतील मलुष्टे कुटुंबीयांचे प्रतिनिधी श्री. कबीर मलूष्टे , कमांडर श्री. रामानुजन दीक्षित (2 महाराष्ट्र नेवल युनिट रत्नागिरी) ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य श्री. सुनील गोसावी ,पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर , छंदोत्सव प्रमुख श्री. मकरंद दामले सर , तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.अशाप्रकारे दोन दिवस आयोजित केलेल्या छंदोत्सवाअंतर्गत रंगमंचीय कार्यक्रमांची सांगता पारितोषिक वितरणाने झाली.