मसुरे | झुंजार पेडणेकर : कोकणात पाऊस भरपूर पडत असून रबी व उन्हाळी हंगामासाठी शेतीकरिता पाणी नियोजनाकरिता वनराई बंधाऱ्याचे महत्व अनन्य साधारण आहे. वनराई बधाऱ्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र रबी हंगामामध्ये लागवडीखाली येऊ शकते असे मनोगत मा तालुका कृषी अधिकारी श्री अमोल करंदीकर यांनी व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवणद्वारा व ग्रामपंचायत, वायंगवडे यांच्या सहकार्याने वायंगवडे येथे कृषि अधिकारी व ग्रामस्थ यांच्यामार्फत श्रमदानातून वनराई बंधारा घालण्यात आला. सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री अमोल करंदीकर, सरपंच श्रीम विशाखा सकपाळ, उपसरपंच श्री विनायक परब, मंडळ कृषी अधिकारी पोईप श्री दशरथ सावंत, मंडळ कृषी अधिकारी आचरा श्री हुसेन अंबार्डेकर, उपकृषि अधिकारी श्री श्रीपाद चव्हाण, सिताराम परब, संचिता फाळके, ग्रा प सदस्य श्रीम सानिका राणे, मयुरी परब, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री जयवंत परब, ग्रामस्थ गणेश घोगळे ‘ लक्ष्मण शिंदे , शिवाजी सावंत ‘ गोपाळ राणे, दादू राणे, संदिप राणे, संतोष शेटये, संजय परब, बाळा घाडी , सिद्धी परब वर्षा राणे, विजय परब, मनोरंजन परब, गणपत कदम, राजेंद्र राणे, तालुका कृषि अधिकारी, मालवण कार्यालय अधीनस्थ सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी श्री कृष्णा दळवी यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मालवण यांनी वनराई बंधारा सारखा स्तुत्य उपक्रम गावात राबविल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त केले.











