विविध कार्यक्रमाचे आयोजन
गुहागर प्रतिनिधी :
गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.१ च्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शतक महोत्सवानिमित्त उद्या रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ८ ते १० वा. ग्रंथ दिंडी,सकाळी १० ते १०.३० वा. उद्घाटन समारंभ (प्रवेशद्वार, प्रयोग शाळा, डिजिटल क्लासरूम, वाचनालय, रांगोळी प्रदर्शन, ध्वजस्तंभ, रंगमंच),सकाळी १०.३० ते १ वा.स्वागत व सत्कार समारंभ आणि मान्यवरांचे मनोगत
दुपारी १.३० ते २.३० वा.स्नेह भोजन,सायं. ३.३० ते ५.३० वा. :
माजी विद्यार्थी कलाविष्कार,रात्रौ ९ ते ११ वा. शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडणार आहेत.या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी व हा दैदिप्यमान सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अगत्य यावे यासाठी हे निमंत्रण…. अगत्याचे व आपुलकीचे निमंत्रण देण्यात येत आहे.तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन शतक महोत्सव समिती, सरपंच व सर्व सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व वाडी प्रमुख, माजी विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात येत आहे.












