अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची वेंगुर्ले नगरपरिषदेला भेट

वेंगुर्ले : प्रतिनिधी
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हिंदी अभिनेता कुणाल विजयकर यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालनास भेट दिली. यावेळेस वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी त्यांचे स्वागत केले.महाराष्ट्र शासन पर्यटन संचालक यांमार्फत 15 डिसेंबरपासून 3 महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रात गंतव्यस्थानाच्या जाहिरातीसाठी 6 माहितीपटांची मालिका शूट करण्यासाठी tv 18 ब्रॉडकास्ट लिमिटेडची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे.

या मालिकेमध्ये वेंगुर्लेमधील मत्स्य बाजारपेठ, वेंगुर्ला नगरपरिषद इमारत, कलादालन, वेंगुर्ला लाईट हाऊस या ठिकाणांचा समावेश आहे. ही मालिका म्हणजे वेंगुर्ला शहर पर्यटनासाठी नक्कीच हातभार असेल.सदर माहितीपट मालिका शूट करण्यासाठी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हिंदी अभिनेता कुणाल विजयकर यांनी वेंगुर्ला नगरपरिषद स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन यास भेट दिली. यावेळेस वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी कम्पोस्ट डेपो येथे तयार केलेले जैविक खत तसेच फुलाचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले.यावेळेस मुख्याधिकरी यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत राबविले जाणारे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प यांची माहिती दिली. वेंगुर्ला स्वच्छता पॅटर्न, क्रॉफर्ड मार्केट तसेच वेंगुर्ला नगरपरिषद पर्यटनाला चालना देण्यासाठी करत असलेले विविध प्रकल्प यांची माहिती दिली.