काळबादेवी येथील हसनपीर बाबांचा उरूस आज 3 जानेवारीला

रत्नागिरी/ वार्ताहर:
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील हसन पीर बाबांचा उरूस शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे
प्रतिवर्षाप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा काळबादेवी येथील हसन पीर बाबांचा उरूस मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे त्यानिमित्त आज शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी भक्तांचे नवस स्वीकारले जातील रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी गिलीफाचा ग्राम दक्षिणेचा कार्यक्रम सुरू होईल ग्रामदक्षिणा पूर्ण झाल्यावर उत्तर रात्री बाबांचा प्रसादाचा कार्यक्रम होईल त्यानंतर उरूस कार्यक्रमाची सांगता होईल तरी आपण हसन पीर बाबांचा उरूस कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे अध्यक्ष श्री अनंत बनप यांनी आवाहन केले आहे