राजापूरातील डफ शाहीराचा ११ जानेवारी रोजी नालासोपारा येथे गीतांचा कार्यक्रम

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील कार्शिगे गावचे रहिवासी व शाहीर, कवी, वस्ताद गुरुवर्य स्वर्गीय गोविंद बाळू कार्शिगकर शक्तिवाले (भानुदास घराणे) यांच्या स्मरणार्थ अनादी सिध्द शक्ति-तुरा समाज शाहीर संघ राजापूर (रजि.) मुंबई विमाग यांच्यावतीने रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी स. ११ वा नालासोपारा पूर्व येथे कोकणवासीय पंचरंगी डफ गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सत्यवान गोविंद कार्शिगकर शक्तीवाले शाहीर (उपळ काशिगेवाडी), उमेश लक्ष्मण वाजे-शक्तिीवाले शाहीर (दोनिवडे, गवळीवाडी), दत्ताराम राम सौंदळकर-तुरेवाले शाहीर (आंगले), गणपत जानू बाईत-तुरेवाले शाहीर (तारळ चौके), मधुकर गणपत पंदेरेसह शाहीर तुषार मधुकर पंदरे-तुरेवाले शाहीर (केळवली ता. लांजा) आदी शाहीर आपली कला सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाला शाहीर सत्यवान गोविंद कार्शिगकर सह शक्तिवाले शाहीर चंद्रकांत अनाजी वालम (अध्यक्ष अनादी सिध्द शक्ति-तुरा समाज शाहीर संघ, राजापूर) आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नागरीकांनी उपस्थित राहून पंचरंगी डफ शाहीरी गीतांचा आनंद घ्यावा असे आवाहन विश्वनाथ दादू मटकर (अध्यक्ष), दिनेश तुकाराम कुडकर (सचिव), संतोष शंकर कुळये आणि कार्यकारिणी मंडळ व सभासद यांच्या वतीने करण्यात आले आहे.