राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने नगराध्यक्षा एड. खलिफे व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर प्रतिष्ठान, राजापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने राजापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांना प्रतिष्ठानतर्फे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये राजापूरच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सहकार क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान राहिलेल्या दिवंगत उद्योजक प्रकाश कातकर यांचे शहरातील सिनेमागृह नजीकच्या चौकाला नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. जमीर खलिफे, विनय गुरव, राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे, सचिव राजू कार्शिंगकर, उपाध्यक्ष अशफाक मापारी, कार्याध्यक्ष सुधीर विचारे, खजिनदार गोपाळ गोंडाळ, सहसचिव सुभाष नवाळे, जेष्ठ मार्गदर्शक सत्यवान कणेरी, राजेश खांबल, सुहास कुपले, दिलीप नलावडे, नामदेव नागरेकर, प्रशांत गुरव, सुरेंद्र तांबे यांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
राजापूर नगर परिषदेच्या नुकत्याच सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीमध्ये अ‍ॅड. खलिफे या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्यासह नगरसेवक अ‍ॅड. श्री. खलिफे यांचा प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राजापूरच्या विकासासंबंधित चर्चा करताना नगराध्यक्ष अ‍ॅड. सौ. खलिफे यांनी सर्वांच्या सहकार्याने राजापूर नगरीचा सर्वांगीण विकास साधण्याचा मानस व्यक्त केला.