शिरोडा विद्यालयाच्या आयुषी गावडेला कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

आर्वी गावडे हिची कास्य पदकाची कमाई 

जिल्हाभरातून अभिनंदन

वेंगुर्ले l प्रतिनिधी :   विरार मुंबई येथे रविवारी संपन्न झालेल्या स्टेअर्स युथ महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत शिरोडा येथील गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय व बी. एम. ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आयुषी अविनाश गावडे हीने कराटे स्पर्धेत सुवर्णपदक व कास्यपदक पटकावत घवघवीत यश संपादन केले. तसेच आर्वी अविनाश गावडे हीने कराटे स्पर्धेत दोन कास्य पदकांची कमाई केली.

 

स्टेअर्स स्टेट युथ गेम्स,वेस्टर्न महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप २०२५-२६ राज्यस्तरीय स्पर्धा विरार येथील ग्रीन पॅलेस रिसॉर्ट अर्नाळा बिच येथे संपन्न झाली. राज्यभरातील विविध अकॅडमी मधील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

 

इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सेल्फ डिफेन्सचे मुख्य संचालक व प्रशिक्षक किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयुषी व आर्वी प्रशिक्षण घेत आहेत. आयुषी हिची दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आयुषी व आर्वी यांच्या यशाबद्दल त्यांचे शिरोडा व जिल्हाभरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.