तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये लांजा नं. १ शाळेचे सुयश

लांजा (प्रतिनिधी):  हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये पीएमश्री लांजा नं.१शाळेतील विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत प्रशालेचा १२ वर्षाखालील कबड्डी मुलांचा संघ तालुका स्तरावर अंतिम विजेता ठरला असून डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये लांजा तालुक्याचे नेतृत्व करणार आहे. शाळेतील कु. बबीदेवल राजू पासवान व कु पप्पू अजय गुप्ता या विद्यार्थ्यांची लांजा तालुक्याच्या १५ वर्षाखालील कबड्डी संघात निवड झाली आहे. तसेच इयत्ता पाचवीमधील कुमार सनीदेवल राजू पासवान हा गोळाफेक या क्रीडाप्रकारात लांजा तालुक्यामध्ये प्रथम आला असून थाळीफेक या क्रीडाप्रकारात द्वितीय आला आहे. इयत्ता सातवीमधील कु.बॉबी देवल पासवान हा विद्यार्थी थाळीफेक क्रीडाप्रकारात द्वितीय आला आहे. या सर्व विदयार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक विघ्नेश गुरव यांचे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य , शाळेचे सर्व शिक्षक , पालक यांनी अभिनंदन केले आहे.