मंडणगड प्रतिनिधी:– मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी मोलाचे कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयत्ती दिनाचे औचीत्यसाधून भारतीय जनता पार्टी तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने मंडणगड तालुक्यातील माध्यम व समाजमाध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला या निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमास भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा चिटणीस अप्पासाहेब मोरे, रविकुमार मिश्रा, गिरीश जोशी, वैभव नारकर, मकरंद रेगे, राजेश नगरकर, मुनीराज नारकर, राजेश पारेख, पत्रकार सचिन माळी, प्रशांत सुर्वे, विजय जोशी, महेश महाजन, भरत सरपरे यांच्यासह पार्टीचे तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचे सुरुवातीस उपस्थित पत्रकारांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्तावीक करताना अप्पासाहेब मोरे यांनी लोकशाहीतील पत्रकारिता या चौथ्या आधारस्तंभाचे महत्व विषद केले ग्रामिण पत्रकरितेचे माध्यमातून तालुक्यातील ग्रामिण भागाचे प्रश्न मांडण्यासाठी येथील माध्यमे करीत असलेल्या कार्याचा त्यांनी यावेळी गौरव केला. झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडीत ग्रामिण भागात होत असलेल्या स्थित्यरांची पत्रकारांना माहीती देत असताना निवडणुकांचे पार्श्वभूमीवर वेगेवगळे बदल होत असतानाही विचारांचे आधारावर अत्योद्य व जनकल्याणाच्या उद्देशाने पार्टीचे काम स्थिरपणे तालुक्यात प्रगतीच्या वाटेवर जात असल्याचे व जनाधार वाढत असल्याचे यावेळी सांगीतले. यावेळी पत्रकार सचिन माळी व विजय जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.










