आंबेवाडी येथील कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

राजापूर प्रतिनिधी :शहरातील आंबेवाडी येथील कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या हस्ते फिक कापून करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे शहरातील आंबेवाडी येथील कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही या जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रतिष्ठानचे हे स्पर्धा आयोजनाचे १२ वे वर्ष आहे. जिल्हयातील निमंत्रित संघांसाठी या स्पर्धा होत आहेत.
या स्पर्धेचा शुभारंभ राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या हस्ते फिक कापून करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर, नगरसेवक सुबोध पवार, कुणबी पतपेढीचे उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, कुणबी पतपेढीचे सीईओ जितेंद्र पाटकर, संचालक रमेश सुद, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर, माजी नगरसेवक जितेंद्र मालपेकर, राजापूर प्रतिष्ठानचे मोहन पाडावे, शैलेंद्र संसारें आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वीततेसाठी आंबेवाडी येथील कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
याप्रसंगी मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत निमंत्रित २० संघाचा सहभाग आहे. या स्पर्धेचा सांगता समारंभ बुधवारी ७ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.