राजापूर (वार्ताहर): शहरातील जय महाराष्ट्र मित्रमंडळ गुरववाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ही नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या मंडपात शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत गुरववाडी श्री चा बहुमान अभिनंदन सातोपे यांनी पटकावला.
या स्पर्धेत लहान गटात १६ तर मोठया गटात १२ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत फैजान मुल्ला याने द्वितीय, विनित बेडेकर याने तृतीय क्रमांक पटकावला. बेस्ट पोझर म्हणून नैतिक चव्हाण तर उगवता तारा म्हणून प्रथम घाडी याला स्पर्धा पुरस्कर्ते तथा प्रमुख पाहुणे एड. महेश नकाशे यांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल गुरव, उपाध्यक्ष ऋषीकांत अमरे, सचिव जगदिश गुरव खजिनदार प्रभाकर गुरव व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून हौशी शरीरसौष्ठव संघटना राजापूर अध्यक्ष दिनानाथ कोळवणकर, राजीव राणे, संदिप चव्हाण यांनी काम पाहिले.















