ओटवणे (प्रतिनिधी)
ओटवणे नदीपात्रात सध्या मगरिंच वाढत वास्तव्य सध्या धोकादायक बनत असून नदीपात्राच्या आवारात चरण्यासाठी जात असणाऱ्या गायी म्हैस तसेच या परिसरात जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी धोकादायक बनत आहे या नदीपात्रात मगरीच वास्तव्य गेले कित्तेक वर्षे सातत्याने पाहायला मिळत असून कधीतरी दृष्टीस पडणाऱ्या मगरी आता सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. २० ते २५ मगरींचे दर्शन एकाच ठिकाणी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ओटवणे-कापईवाडी येथील ‘वडाचे गळू’ परिसरात नदीकाठी मोठ्या संख्येने मगरी दिसून येत आहेत.
या नदीपात्रा लगत ओटवणे, विलवडे भागातील शेतकऱ्यांच्या बाग बागायती आहेत.अनेक वर्षांपासून ओटवणे नदीपात्रात मगरींचे वास्तव आहे पण आता मात्र मोठ्या संख्येने यात वाढ झाली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मगरी दिसून येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.यामुळे नदीकाठी असणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो सध्या तरी या मगरी पाळीव जनावरे किंव्हा माणसांवर हल्ला केल्याची घटना घडली नसली तरी भविष्यात अशा घटना घडून प्राण हानी वित्त हानी होऊ शकते याची गंभीर दखल घेऊन वनविभागाने तात्काळ या मगरिंची संख्या कमी करत लवकर पावले उचलून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडाव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांवरील हे संकट दूर होईल, अशी मागणी ओटवणे परिसरातील शेतकरी ग्रामस्थ यांसकडून करण्यात येत आहे.












