मुणगे हायस्कुलच्या माजी विध्यार्थ्यांनी जपली शैक्षणिक बांधिलकी!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री भगवती हायस्कूल मुणगेच्या सन 2019 -20 च्या दहावीच्या बॅचच्या विध्यार्थ्यानी शाळेसाठी आवश्यक वस्तू घेण्यासाठी 27 हजार 777 रुपयाची रोख रक्कम संस्था अध्यक्ष न.ना. पंतवालावलकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, संस्था सचिव विजय बोरकर, मुख्याध्यापिका एम बी कुंज, प्रशालेचे शिक्षक प्रसाद बागवे आदी संस्था सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशालेचे विध्यार्थी किरण मुणगेकर, ओमकार धुरी,अवंतिका घाडी, पुनव तेली, गणपत परब, गौरेश राणे, सुजल चव्हाण, हर्षदा मोरवेकर,दीप्ती जोशी, मानसी आईर, देवेन घाडी, मनोज पुजारे, समीर मुणगेकर, साहिल मुणगेकर, प्रणाली सावंत, कांचन परुळेकर, सेजल बागवे, प्रणव सावंत, सोहम हिंदळेकर, योगिता रुपये, विठ्ठल लब्दे, कीर्ती पुजारे, वैष्णव रूपे, मनस्वी ठाकूर, जयश्री मेस्त्री,रितेश घाडी, सुष्मिता घाडी, प्राची सावंत आदी विध्यार्थ्यानी आर्थिक योगदान देऊन सदर रक्कम जमा केली आहे. संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.