वैभववाडीत पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांना आमदार नितेश राणे यांच्याकडून रेनकोटचे वाटप

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

भाजपाच्या वतीने आजचा दिवस सेवादिन म्हणून साजरा

वैभववाडी | प्रतिनिधी : कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्याकडून वैभववाडी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त रेनकोट वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, आजचा दिवस आम्ही सेवादिन म्हणून साजरा करत आहोत. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. मतदारसंघातील कणकवली व देवगड येथील पोलीस बांधवांना देखील रेनकोटचे वाटप केले जाणार आहे. निस्वार्थी व कर्तव्यदक्षपणे पोलीस बांधव आपली सेवा बजावत असतात. पावसाळ्यात त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही त्यांना रेनकोटचे वाटप करत आहोत.
यावेळी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, पोलीस उपनिरीक्षक श्री. खोत, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, नेहा माईणकर, सुधीर नकाशे, सज्जन काका रावराणे, बंड्या मांजरेकर, संजय सावंत, विवेक रावराणे, महीला पदाधिकारी प्राची तावडे, नवलराज काळे, प्रदीप रावराणे, रोहन रावराणे, संताजी रावराणे, सुभाष रावराणे, प्रकाश सावंत, प्रकाश पाटील, अवधुत नारकर, प्रदीप नारकर, योगेश पाथरे सर्व नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.