मसुरे | झुंजार पेडणेकर : यशस्विनी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आडबंदर/ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे येथे बसविण्यात आलेल्या १५ सौर पथदिव्यांचे नुकतेच लोकार्पण समाजसेवक श्री. आनंद मालाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. आडबंदर येथे ७,आपई ३,कारीवणे ३,देऊळवाडी १,वाघोळी १ येथे नव्याने सौर पथदीप बसविण्यात आले आहेत.
यावेळी माजी सरपंच सायली बागवे, माजी उपसरपंच श्री.धर्माजी आडकर, ग्राम.सदस्या सौ. रविना मालडकर, सौ.अंजली सावंत यांनी सौर पथदिवे बसवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यावेळी पांडुरंग बापर्डेकर,तुळशीदास आडकर,अनिल देऊलकर,लीना आडकर,तुषार आडकर,संतोष बांदेकर,वैभव आडकर कल्पेश सारंग,बाळकृष्ण परब,श्रद्धा राऊत,दिगंबर बागवे,किशोरी सावंत,कविता सावंत,दुर्गा परब,संदीप आचरेकर,देविदास सावंत,एकनाथ परब,विजय पडवळ,विजय परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांचा वत्तीने श्री.आनंद मालाडकर यांचे सर्वांनी कौतुक करत आभार मानले.