जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी घेतला आंगणेवाडी जत्रा नियोजन आढावा!

मसुरे | झुंजार पेडणेकर      :लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव 9 फेब्रुवारी रोजी होत आहे. जत्रोत्सवास उपस्थिती दर्शविणाऱ्या लाखो भावीकांच्या सुरक्षिततेच्या नियोजनाची माहिती शुक्रवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी आंगणेवाडी येथे भेट देऊन घेतली. यावेळी पार्किंग व्यवस्था, रांग व्यवस्था याबाबत सुद्धा त्यांनी सूचना केल्या. यावेळी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने काका आंगणे, सतीश आंगणे, बाबू आंगणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कांबळे , स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप, वाहतूक शाखेच्या अरिफा मुल्ला , पोलीस उपनिरीक्षक देसाई, पोलीस उपनिरीक्षक भोसले, मसुरे बिट अंमलदार हुंबे, तसेच काका आंगणे, बाबू आंगणे, पोलीस पाटील पंकज आंगणे, सतीश आंगणे, दिनेश आंगणे, समीर आंगणे, नंदू आंगणे, रुपेश आंगणे, भरत आंगणे, भास्कर आंगणे, इ उपस्थित होते.