ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी स्वीकारला सन्मान…
परुळे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत मधील उपक्रमाची माहिती ग्रामपंचायत अधिकारी श्री शरद शिंदे यांनी यशदा प्रशिक्षण संस्था पुणे येथे कार्यशाळेत दिली. यावेळी ग्रामपंचायतच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा सन्मान ग्रामपंचायत अधिकारी श्री शरद शिंदे यांनी स्वीकारला.
देशपातळीवरील आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातून परुळे बाजार ग्रामपंचायत चा हा सन्मान झाला. परुळेबाजार ग्रामपंचायत कायॅक्षेत्रातील गावातील सवॅ महिलांचा ग्रामपंचायतीमध्ये सहभाग वाढवून त्यांना रोजगार उपलब्ध केला. त्याच्या रोजगारा साठी सुरक्षित वातावरण गावात निर्माण करणे व गावातील मुलींना/ बालिका यांना सक्षम करणे अशी प्रत्येक जिल्ह्य़ातून एक ग्रामपंचायत निवड केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत यात निवड झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कशाप्रकारे कामे झाली कशा प्रकारे महिलांचा कसा सहभाग वाढविला, देशात सुध्दा प्रत्येक राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एक ग्रामपंचायत निवड करून ते आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत बनवुन प्रत्येक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला मार्गदर्शक ठरणार आहे. त्यानुसार परुळेबाजार ग्रामपंचायतीत काथ्या व्यवसाय मधुन २५० ते ३०० महिलांना रोजगार निर्माण केला. तालुकास्तरीय प्लास्टिक युनिट चालविण्याचा मक्ता महिला बचतगटामार्फत चालविला जात आहे. महिला बचतगटामार्फत पाणी सोडणे व पाणी पट्टी वसुली करणे व गांङुळखत युनिटमाकॅत खत निमाॅण करणे सांडपाणी युनिट केले. पायपुसणी मशीन उपलब्ध करून रोजगार उपलब्ध करून दिला. पंचायत लनिॅग सेंटर परुळेबाजारला अनेक जिल्हा परिषद व गावे भेट देत आहेत. त्यावेळेस महिला बचतगटा मार्फत स्टाॅल उभारून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तु विक्री होऊन उत्पन्न मिळत आहे. उदबत्ती युनिट करून रोजगार आदर्श महिला बचतगटामार्फत मार्गदर्शन करतात गावातील शाळा अंगणवाङी ङिजिटल व स्मार्ट टिव्ही वायफाय सुविधा शौचालय सुविधा अस्मिता कक्ष सॅनेटरी पॅङ ङिस्पोज मशीन बसविले सुरक्षिकतेसाठी आपत्कालीन हेल्पक्रमांक बोङॅ लावले गावात सीसी टिव्ही बसविली आहेत तसेच गाव अनेमियामुक्त गाव अंतर्गत महिलांचा हिमोग्लोबीन तपासणी करून अनेक उपक्रम राबवत आहे. महिला बचतगटांना विविध प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. याच उपक्रमाची माहिती यशदा येथील कार्यशाळेत केले या सर्व उपक्रमामुळे ग्रामपंचायतीचे कौतुक केले.












