डाएट चे अधिकारी राहुल बर्वे यांची माखजन हायस्कुल ला भेट

गौरव पोंक्षे माखजन:
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी राहुल बर्वे यांनी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन,ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली.
पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या एच एस सी ,व एस एस सी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, परीक्षेचा राजमार्ग अंतर्गत,परीक्षा पूर्व भेटी साठी डाएट चे अधिकारी राहुल बर्वे उपस्थित होते.परीक्षेचा राजमार्ग अंतर्गत असलेल्या सर्व बाबींची राहुल बर्वे यांनी पाहणी केली.
सोबतच प्रशालेतील कलादान,संगीत कक्ष,संगणक कक्ष,क्रीडा विभाग,समृद्ध वाचनालय,तीन स्वतंत्र प्रयोगशाळा,अटल टिंकरिंग लॅब,आदी गोष्टींची पाहणी केली.व समाधान व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,वरिष्ठ लिपिक नितीनराज दळवी,गणेश शिंदे,संतोष कुलकर्णी,अमोल पाटील,अभिजित सहस्त्रबुद्धे,सचिन साठे आदी उपस्थित होते.