आचिर्णे येथील विविध विकासकामांचा शुभारंभ

जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी l प्रतिनिधी :

आचिर्णे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. आचिर्णे रेल्वे स्टेशन जोडरस्ता डांबरीकरण या कामाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार आचिर्णे रेल्वे स्थानक जोडरस्ता डांबरीकरण मजबुतीकरणासाठी विकास निधी देण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून तब्बल 25 लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर केला.

तसेच आचिर्णे कडुवाड़ी रस्ता डांबरीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अंतर्गत 5 लाख निधी मंजूर झाला आहे. या विकासकामाचे लोकार्पण दिलीप रावराणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, सरपंच वासुदेव रावराणे, वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, माजी पं. स. सदस्य मंगेश लोके, संजय गांधी निराधार समिती सदस्य सिद्धेश उर्फ बंटी दिलीप रावराणे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, जयसिंग रावराणे, जयसिंग रावराणे, रितेश सुतार, उत्तम सुतार, रूपेश रावराणे, आदेश रावराणे, आदेश रावराणे, संजय सावंत, उमेश पवार, महेश चडवाण, सुनील रावराणे, सुशील रावराणे, लवू पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.