आमदार निलेश राणे यांच्या आमदार निधीतून धामापूर येथे रस्ता काम मंजूर
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शुभारंभ
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत धामापूर परबवाडी ते भटवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण काम मंजूर झाले.
या कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सौं. मानसी महेश परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिप माजी सभापती संतोष साटविलकर, शिवसेना विभागप्रमुख राजन माणगावकर,
सरपंच मानसी परब, उपसरपंच
रमेश निवतकर, अभिषेक भोसले, प्रताप चव्हाण, प्रशांत गावडे, बाबू तोरसकर, स्वप्नील नाईक, संतोष मराठे, बाबू आंगणे, दिनेश गावडे, सुनील देसाई, सचिन गावडे, आनंद गावडे, दीपक गावडे, सत्यवान गावडे, निशा गावडे, आसावरी भोसले, समीक्षा मराठे, महेश परब, प्रविण परब यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.














