NAVI MUMBAI | खारघरमध्ये कॉलेजपासून अवघ्या ७० मीटर अंतरावर हुक्का विक्री; दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई : खारघरमध्ये शैक्षणिक संस्थेपासून अवघ्या ७० मीटर अंतरावर हुक्का पिण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आयटीएम कॉलेजजवळ हुक्का साहित्याच्या दुकानावर पोलिसांनी कारवाई केली असून, परवेझ मेहमूद शेख या २५ वर्षीय दुकानदाराविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानात प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स आणि तंबाखूशी संबंधित साहित्य ठेवून ग्राहकांना हुक्का पिण्याची सुविधा दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.