राज्यभरातून ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्या वतीने आयोजित ‘वीर जवान दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध भागांतून ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना ही स्पर्धा समर्पित करण्यात आली होती.
मोती तलावाच्या काठावरील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे मशाल प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर सैनिक स्कूलचा कॅडेट अथर्व पालव याने स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या, तर क्रीडा शिक्षक मनोज देसाई यांनी नियमांचे वाचन केले.
ही स्पर्धा १०, १४, १७ वर्षांखालील मुले-मुली व खुला गट अशा सात वयोगटांत पार पडली.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, कर्नल विजयकुमार सावंत यांच्या हस्ते झाला.
विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सैनिक स्कूलचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव जॉय डोन्टस, प्राचार्य नितीन गावडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. के. गावडे व शैलेश नाईक यांनी केले.
स्पर्धेचा निकाल:
१० वर्षांखालील मुले: स्वराज सावंत (प्रथम), सर्वेश कापडी (द्वितीय), निर्मय रेडकर (तृतीय).
१० वर्षांखालील मुली: हिंदवी दळवी (प्रथम), स्पृहा नार्वेकर (द्वितीय), काव्या राऊळ (तृतीय).
१४ वर्षांखालील मुले: वेदांत पाटील (प्रथम), भावेश यादव (द्वितीय), वेदांत भोपळे (तृतीय).
१४ वर्षांखालील मुली: अनन्या कुंभार (प्रथम), आस्था लिंगवत (द्वितीय), श्रावणी महाडेश्वर (तृतीय).
१७ वर्षांखालील मुले: जयेद शेख (प्रथम), सुनील जंगले (द्वितीय), यश कडव (तृतीय).
पुरुष खुला गट: ओमकार बैकर (प्रथम), आदित्य राऊळ (द्वितीय), ओम उन्हाळकर (तृतीय).
महिला खुला गट: मेघा सातपुते (प्रथम), रेश्मा पांढरे (द्वितीय), तेजस्वी गावडे (तृतीय).













