उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेना नगरसेवक दिपक पाटकर यांचा एकमेव अर्ज

शिवसेना-भाजपा नगरसेवकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

मालवण | प्रतिनिधी : मालवण उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेना नगरसेवक दिपक पाटकर यांचा एकमेव अर्ज शिवसेना-भाजपा नगरसेवकांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांच्याकडे दाखल करण्यात आला. विहित मुदतीत दिपक पाटकर यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

 

तर दोन स्विकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना गटाकडून महेश कांदळगावकर तर भाजपा गटाकडून रविकिरण तोरसकर यांचे अर्ज दाखल असल्याने त्यांचीही निवड निश्चित मानली जात आहे.

 

दिपक पाटकर यांचा उमेदवारी दाखल करताना नगराध्यक्ष ममता वराडकर, शिवसेना गटनेते पूनम चव्हाण, मेघा गावकर, निना मुंबरकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, भाजप नगरसेवक गटनेत्या अन्वेषा आचरेकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, आदी उपस्थित होते. यावेळी नगरपरिषद सभागृहात नगरसेवक मंदार केणी, ललीत चव्हाण, अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर, उबाठा नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर अनिता गिरकर यांसह नगरपरिषदेत मोहन वराडकर, किसन मांजरेकर, यशवंत गावकर, संदिप मालंडकर, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.