जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद

 

मुंबई,  — जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे आज मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद दुपारी ४.०० वाजता सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल, मुंबई येथे होणार आहे.

या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबतची महत्त्वाची माहिती, निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक तसेच आयोगाची भूमिका यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्यावतीने सर्व वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी अथवा प्रतिनिधींनी या पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी केले आहे.