राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सावंतवाडी । प्रतिनिधी : रत्नागिरी येथे झालेल्या शालेय विभागीय कॅरम स्पर्धेत १९ वर्षाखालील
गटात आर. पी. डी. हायस्कूलचा विद्यार्थी तसेच मळगाव गावचा सुपुत्र कु. मयुरेश तुळशीदास नाईक उपविजेता ठरला. त्याची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत निवड झाली आहे.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
मयुरेश नाईक याने यापूर्वीही तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क़माक पटकविला होता तसेच राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली होती. त्याला योगेश फणसळकर, हरीष नार्वेकर यांचे लहानपणापासून मार्गदर्शन लाभले आहे. कॅरम सोबतच लहानपणापासून शालेय स्तरावर अनेक वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होत त्याने मोठे यश प्राप्त केले आहे.
Sindhudurg