ज्ञानदीप भडगावचे रेखाकला ग्रेड परीक्षेत उज्ज्वल यश

०३ विद्यार्थ्यांना ‘A’ ग्रेड, ११ विद्यार्थ्यांना ‘B’ ग्रेड

खेड (प्रतिनिधी) – कला संचलनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तर्फे सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या रेखाकला ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव या शाळेने यंदाही उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखली आहे. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा एकत्रित निकाल ९८.१४ टक्के इतका लागला असून शाळेच्या ०३ विद्यार्थ्यांनी ‘A’ ग्रेड तसेच ११ विद्यार्थ्यांनी ‘B’ ग्रेड मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
‘A’ ग्रेड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एलिमेंटरी परीक्षेत सई गजानन पालांडे हिने तर इंटरमिजिएट परीक्षेत रुद्र राहुल तुगांवकर आणि धनश्री दीपक टक्के यांनी चमकदार कामगिरी बजावली. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण कार्याची प्रशंसा होत आहे.
‘B’ ग्रेडमध्ये ११ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले असून एलिमेंटरी परीक्षेत आराध्या तुषार शिगवण, प्रयाग अजय शिंदे, श्रेया किरण कोलगे आणि स्नेहा हरिश्चंद्र कदम यांनी चांगली कामगिरी केली. इंटरमिजिएट परीक्षेत तेज राजेश भागणे, आर्या अनिल विचारे, मैथिली संतोष शेलार, मयुरेश सतिश फागे, राजनंदिनी संदीप सावंत, हर्ष वैभव जाधव आणि संस्कृती अजित भोसले यांनी ‘B’ ग्रेड मिळवत यशाची नोंद केली.
दोन्ही स्तरांवर एकूण ९३ विद्यार्थ्यांना ‘C’ ग्रेड प्राप्त झाली असून सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील कला शिक्षक सुनील यादव यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. त्यांच्या संयमी व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी साधली असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळ, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे मनोबल वाढवले.
ज्ञानदीप विद्या मंदिरच्या सातत्यपूर्ण यशामुळे संस्थेच्या कार्याचा दर्जा आणि शैक्षणिक योगदान अधोरेखित होत असल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले आहे.