ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे–बोरज येथे राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

खेड (प्रतिनिधी) – ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड–रत्नागिरी संचालित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) मोरवंडे–बोरज येथे राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य भरत मोरे यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून केली.
प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक एम. एम. चिले यांनी केले, तर सहाय्यक शिक्षिका दामिनी महाजन यांनी राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली.
या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी कविता वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात तांबट सान्वी प्रीतम (इ.३री) हिने प्रथम क्रमांक मिळवला. पंदेरे काव्या विजय (इ.३री) आणि शिंदे स्वरा सचिन (इ.२री) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर दळवी आद्य प्रमोद (इ.३री) आणि पालापुरे पूर्वा योगेश (इ.१ली) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
पाचवी ते नववी गटात आंब्रे मनस्वी महेंद्र (इ.६वी) प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. कासुकर श्रद्धा स्वानंद (इ.६वी) हिला द्वितीय क्रमांक तर पालकर अस्मि मनोज (इ.५वी) आणि मोरे पार्थ विजय (इ.९वी) यांनी तृतीय क्रमांकावर हक्क मिळवला.
स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक प्रभात भोसले यांनी मानले. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य भरत मोरे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, प्रेरणा आणि राष्ट्रीय नेत्यांविषयी आदरभाव वाढीस लागतो, असे मत शिक्षकवर्गाने व्यक्त केले.