राजापूर (वार्ताहर): नागरीकांना काय पाहिजे हे राज्यकर्त्यांना समजत नाही आणि काय नको हे प्रशासनाला समजत नाही, त्यावेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम पत्रकार करत असतात. राजापुरातील पत्रकार हे अशा प्रकारे बाळशास्त्री जांभेकरांच्या निर्भिड पत्रकारीतेचा वारसा पुढे नेण्याचे काम करत आहेत, असे गौरवोद्गार राजापूर दिवाणी न्यायालयातील सरकारी अभियोक्ता अधिवक्ता भालचंद्र सुपेकर यांनी काढले.
रयत शिक्षण संस्थेच्या हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात पत्रकार दिनाच्या निमित्ताने प्राध्यापक प्रबोधिनी व प्रसिध्दी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार मेळाव्यात पमुख अतिथी म्हणून अधिवक्ता सुपेकर बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाराम राठोड यांया अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमाला व्यासपीठावर राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, संघाचे सल्लागार भास्कर खडपे तसेच शरद पळसुलेदेसाई, उपस्थित होते.तसेच पत्रकार राजेंद्र बाईत, गोकुळ कांबळे, राजेंद्र जोगळे, प्रकाश वळंजू व राजापूर अर्बन बँकेचे संचालक प्रसाद मोहरकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ऍड.सुपेकर म्हणाले की, भारतीय लोकशाहीमधील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीतेकडे पाहिले जाते. उर्वरित तीन स्तंभांची कानउघाडणी करण्याची ताकद या पत्रकारीतेमध्ये आहे. सद्यस्थितीमध्ये एआयचे मोठे संकट पत्रकारीतेवर आहे. मात्र पत्रकार हा सद्सद्विवेक बुद्धीने लिखाण करत असतो, तो विश्लेषक असतो, एआय विश्लेषण करू शकत नाही असे सांगताना कृत्रिम बुद्धीमत्ता ही मानवी बुद्धीमत्तेपेक्षा कमकुवत असल्याचे अधिवक्ता सुपेकर यांनी सांगितले. यावेळी राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.मोहिते यांनी रयत शिक्षण संस्थेमुळे राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मुला-मुलींना उच्च शिक्षणची द्वारे खुली झाल्याचे सांगितले.
यावेळी युवक दिनाचे औचित्य साधून बोलताना पत्रकार संघाचे सल्लागार भास्कर खडपे यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना युवकांना शिक्षणाबरोबरच सुसंस्कारही दिले गेले पाहिजेत. त्यासाठी भावी जीवनात यशस्वी होण्यातील अडथळे ठरणारे स्वभावदोष आणि अहंकार यांच्या निर्मुलनाची आवश्यकता आहे. त्यासाठी प्राध्यापक वर्गाने विशेष लक्ष दिल्यास भविष्यात आदर्शवत तरुण पिढी राष्ट्राला मिळाल्याचे समाधान निश्चित मिळेल असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.राठोड यांनी ग्रामीण भागात राहून लोकशिक्षणचे काम पत्रकार करत असल्यचे सांगितले. यावेळी पत्रकार राजेंद्र बाईत यांना क-हाडे ब्राह्मण संघाकडूननुकताच दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यकमाचे पास्ताविक प्रा.अभिजीत शेवडे यांनी, सुत्रसांलन प्रा.शैलेंद्र पभुदेसाई यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.अतुल टिके यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील पाध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











