प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: राज्यात आज २९ महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज गुरुवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही तासांतच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला, तो पुढे दुपारपर्यंत कायम टिकून राहिला.
दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५०.८५ टक्के मतदान झाले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ९.६४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाचा वेग किंचित वाढला असून, ११.३० वाजेपर्यंत शहरात एकूण २२.४५ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये ६०,५३१ पुरुष आणि ५०,५४७ महिला अशा एकूण ११,१०८५ मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली होती. यामध्ये ९५,६६१ पुरुष आणि ८७,३६१ महिला अशा एकूण १८,३०३० मतदारांनी आपला हक्क बजावला.कोल्हापूरात खा. छत्रपती शाहू महाराज,आ.सतेज पाटील,राजेश क्षीरसागर,खा.धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला.
इचलकरंजी महानगरपालिकेसाठी ३.३० वाजेपर्यंत ४६.२३ टक्के मतदान झाले. दुपारी १.३० पर्यंत ३१.२९ टक्के मतदान झाले होते. पिंक मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंटला महिला, युवतींनी सेल्फी घेत मतदानाचा आनंद लुटला. पहिल्या दोन तासांमध्ये ७.८८ टक्के तर ११.३० वाजेपर्यंत १८.५७ टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी मतदारांचा उत्साह टिकून राहिल्याने दुपारर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, मौसमी आवाडे यांनी मतदानाचा हक्क बजावला













