संस्कृती कला मंच चे उपक्रम लोकाभिमुख आणि लोकोपयोगी असतात– डॉ. गणेश राम यादव.

येथील रुग्णांना अथायु कोल्हापूर कडून मोफत शस्त्रक्रिया आणि पाठपुरावा– डॉ.अण्णा राज अणूसे.

फोंडाघाट मध्ये मूत्र विकार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न !

फोंडाघाट/ कुमार नाडकर्णी– स्व. सचिन नारकर या हरून्नरी युवकाच्या संकल्पनेतून साकारलेल्या संस्कृती कला मंच चे विविधांगी उपक्रमांतर्गत, शांताराम मंगल कार्यालय येथे अथायु युरो केअर, कोल्हापूर व आरोग्य केंद्र यांचे सहकार्याने, मूत्रविकार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले .शिबिराचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते, दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी फोंडा प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश राम यादव तसेच डॉ. शैलेंद्र आपटे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नारे, उपसरपंच तन्वी मोदी,कला मंचच्या प्रिया नारकर ,सुप्रिया रेवडेकर, वर्षा चोरगे, ज्योती पॅरिस, दत्तप्रसाद बिडये,संदीप नानचे, तुषार नेवरेकर, प्रा. व्ही. व्ही. पाटील, संतोष जोईल,जनीकुमार कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी, आपल्या शुभेच्छा देताना, अशा शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा.असे आवाहन केले. अथायुच्या डॉक्टर्सनी आपल्या हॉस्पिटलच्या या शिबिरातील रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा सुविधा स्पष्ट केल्या. संस्कृती कला मंच लोकाभिमुख आणि लोकोपयोगी उपक्रम राबित असते.हे गावचे भूषण आहे. यामध्ये गावातील ग्रामस्थ अबालवृद्ध सहकार्य करतात, हे वाखाण्याजोगे आहे.त्यामुळे नक्कीच संस्कृती कला मंच अभिनंदनास पात्र आहे,असे मान्यवरांनी विचार मांडले.. शुभारंभाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक सुंदर पारकर यांनी तर आभार प्रदर्शन भरत मोरे यांनी केले.या शिबिराचा व मूत्र विकार – प्रोस्टेटच्या बावीस रुग्णांनी लाभ घेतला तर दहा रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला….