वैभववाडी प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी वैभववाडी तालुक्यात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 3 जागांसाठी 15 अर्ज तर पंचायत समितीच्या 6 जागांसाठी 26 अर्ज दाखल झाले आहेत. कोळपे जि. प. मधून सर्वाधिक नऊ अर्ज दाखल झाले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी दिली आहे.
भुईबावडा पंचायत समिती मतदार संघातून – वासुदेव पांडुरंग कामतेकर (अपक्ष) दोन अर्ज, वसंत शिवराम मोरे (उबाठा), जितेंद्र गणपत तळेकर (उबाठा), देवानंद बाळकृष्ण पालांडे (भाजपा), अमोल नारायण मोरे (अपक्ष), रुपेश कांतीलाल गुरव (राष्ट्रीय काँग्रेस),
कोळपे पंचायत समिती मतदार संघातून – सुवर्णा महेश संसारे (भाजपा), रियाना गुलजार काझी (उभाठा) यांनी अर्ज दाखल केले आहेत.
उंबर्डे पंचायत समिती मतदार संघातून – स्मिता संतोष पाटील (उबाठा), साची सचिन कोलते (भाजपा) दोन अर्ज, मैत्री मयूर दळवी (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केला आहे.
कोकिसरे पंचायत समिती मधून – अक्षता सूर्यकांत डाफळे, साधना सुधीर नकाशे (भाजपा) दोन अर्ज,
खांबाळे पंचायत समिती मतदार संघातून – मंगेश तुकाराम लोके (भाजपा), स्वप्नील संतोष रावराणे (उबाठा), सिद्धार्थ तुकाराम कांबळे (राष्ट्रीय काँग्रेस),
लोरे पंचायत समिती मतदार संघातून – जयसिंग हनुमंत रावराणे (भाजपा), वासुदेव अनंत रावराणे (भाजपा), संतोष धोंडू बोडके (अपक्ष), सिद्धेश दिलीप रावराणे (भाजपा), लक्ष्मण पुरुषोत्तम रावराणे (उबाठा), अक्षय अमित बागवे (मनसे), ओमकार दिगंबर रावराणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातून – जितेंद्र गणपत तळेकर (अपक्ष), सुनील सदानंद नारकर (उबाठा), राजेंद्र रवींद्र राणे (भाजपा), अतुल गोविंद सरवटे (भाजपा), अनंत संभाजी फोंडके (भाजपा), प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजपा) चार अर्ज.
कोकिसरे जिल्हा परिषद मधून श्रावणी रोहन रावराणे (भाजपा), शुभांगी अनंत सरवणकर (उबाठा), निमिता किशोर दळवी (भाजपा),
लोरे जिल्हा परिषद मतदार संघातून रिद्धी रितेश सुतार (भाजपा), अनुज्ञा अंकुश अंगवलकर (भाजपा), दिव्या दीपक पाचकुडे (उबाठा) यांनी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्याकडे सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.












